‘खासदारांना अशी वागणूक तर सर्वसामान्यांचे काय?’ सुप्रिया सुळे.
खासदार अमोल कोल्हेंना आलेल्या धमकीवर सुप्रिया सुळेंनी भाष्य केले आहे. ‘पिंपरी चिंचवड येथील प्रयोगाच्या दरम्यान शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या फुकट प्रवेशिकेसाठी पोलिसांनी खासदार अमोल कोल्हे यांना धमक्या दिल्याचे समोर आले. महाराष्ट्र पोलीसांच्या उज्ज्वल प्रतिमेला काळीमा फासणारी ही घटना आहे. खासदारांना पोलीस अशी वागणूक देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल?’, असे सुळे म्हणाल्या.