शून्य कचरा संकल्पना स्पर्धेत महिंद्रा रॉयल हाउसिंग सोसायटीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
महापलिकेच्या‘क’ क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत शून्य कचरा संकल्पना राबविल्याबद्दल महिंद्रा रॉयल हाउसिंग सोसायटीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
यात महिंद्रा रॉयल हाउसिंग सोसायटीने ५५ किलो व्हॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन महापालिका प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. महिंद्रा रॉयल सोसायटीत सौर ऊर्जा पॅनेलमुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होत असून दरमहा दीड लाख रुपयाने बिल कमी येत आहे. सोसायटीला फाइव्ह स्टार रेटिंग मिळाल्याने मिळकतकरातही आता सात टक्के सवलत मिळाली आहे. सिंह म्हणाले, ‘‘शहरातील हाउसिंग सोसायट्यांनी सौर ऊर्जा वापरावी. त्यातून मोठ्या प्रमाणात महावितरणच्या विजेची व सोसायटीच्या वीजबिलात बचत होईल. तसेच, सोसायटीत निर्माण होणाऱ्या ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी हातभार लावावा.’’ या वेळी सहायक आयुक्त अण्णा बोदडे, पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, डॉ. मनीषा गरुड, सोसायटीचे अध्यक्ष संजय पगारे, सचिव राजेश हेबर, खजिनदार वेणू गोपाल, संदीप मोरे, विना दवे, रेखा मुंडके, मनोज सिंग, सोहन मेनी, जगदीश पारी, संतोष मदनगरली, राहुल मराठे आदी उपस्थित होते. दरम्यान, सोसायटीतर्फे आयोजित आरोग्य शिबिरात ५५ जणांची हृदयरोग तपासणी केली. ४५ जणांनी रक्तदान केले. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाचे शिबिरासाठी सहकार्य लाभले.