June 1, 2023
PC News24
महानगरपालिका

अवघ्या दीड महिन्यात शंभर कोटींपेक्षा अधिक रकमेचा कर महापालिकेत जमा.

अवघ्या दीड महिन्यात शंभर कोटींपेक्षा अधिक रकमेचा कर महापालिकेत जमा

आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अवघ्या दीड महिन्यात शहरातील ८७ हजार ४५६ मिळकत धारकांनी शंभर कोटींपेक्षा अधिक रकमेचा कर भरला आहे. त्यात ७० हजार ४८९ नागरिकांनी सुमारे ८० कोटी रुपयांचा ऑनलाइन करभरणा करून विविध सवलतींचा लाभ घेतला.महापालिकेने सिद्धी प्रकल्पाअंतर्गत मिळकतधारकांना घरपोच बिलांचे वाटप सुरू केले आहे. याशिवाय, सर्वांना घर बसल्या सुविधांचा लाभ घेता यावा, यासाठी सर्व सुविधा ऑनलाइन केल्या आहेत. ई-मेलची सुविधा उपलब्ध आहे.

‘खासदारांना अशी वागणूक तर सर्वसामान्यांचे काय?’ सुप्रिया सुळे.

मिळकतकराचा अधिकाधिक भरणा व्हावा, यासाठी महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी निरंतर कर वसुली, सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण आणि माहितीचे शुद्धीकरण अशी त्रिसूत्री आखून कार्यवाही सुरू केली आहे. तसेच, नागरिकांनी ३० जूनपूर्वी कर भरून विविध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंह यांनी केले आहे. सारथी हेल्पलाइनमध्ये करसंकलन विभागासाठी ‘२४ बाय ७’ सुविधा उपलब्ध आहे. शहरात औद्योगिक, निवासी, बिगर निवासी, मिश्र आणि मोकळ्या जमीन अशा पाच लाख ९८ हजार मिळकती शहरात आहेत. १२ हजार १७९ मिळकतधारकांनी १० कोटी ५९ लाख रुपयांचा रोखीने भरणा केला आहे. विविध ॲपच्या माध्यमातून एक हजार २३८ जणांनी एक कोटी पाच लाखांचा कर भरला आहे. तर धनादेशाद्वारे दोन हजार ३७७ जणांनी सहा कोटी ४८ लाखांचा भरणा केला आहे.करभरणा केलेल्या मिळकतीप्रकार / संख्याऔद्योगिक / ३६०निवासी / ८०,५२३बिगर निवासी / ४,९७६मिश्र / १,१४४मोकळ्या जमीन / ४६६इतर / ६वाकडमध्ये अधिक भरणामहापालिकेचे शहरात १७ करसंकलन कार्यालये आहेत. वाकड कार्यालयात १४ हजार ७६८, थेरगाव कार्यालयात नऊ हजार २२८, चिंचवडमध्ये आठ हजार ४७०, सांगवीमध्ये आठ हजार ३८७ नागरिकांनी कर भरला आहे. सर्वात कमी पिंपरीनगर कार्यालयात केवळ ७१४ व तळवडेत ७१८ जणांनीच करभरणा केला आहे.‘‘करसंकलन विभागाकडून त्रिसूत्रीनुसार काम सुरू आहे. जूनपूर्वी वार्षिक उद्दिष्टाच्या पन्नास टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट आहे. नागरिकांनी या जूनपूर्वी करभरणा करून सवलतींचा लाभ घ्यावा.’’अशी माहिती महापालिका सहायक आयुक्त, नीलेश देशमुख दिली

Related posts

वंचित मुलांना यावर्षी तरी मिळेल का सरकाळी शाळेची बससेवा?

pcnews24

पिंपरी चिंचवड मध्ये फूटिचे राजकारण कि राजकारणामूळे फूट !!!!

pcnews24

बांधकाम व्यावसायिकांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग होणार बंधनकारक…

pcnews24

व्हेरॉक वेंगसरकर अकादमीचा ‘अद्विक तिवारी’ सामनावीर.

pcnews24

अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश.. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची ३७ होर्डिंगवर कारवाई.

pcnews24

हिंजवडी पोलिसां कडून जबरी चोर्‍या करणार्‍यांचा पर्दाफाश,चांदणी चौक परिसरातील अनेक गुन्हयांची उकल.

pcnews24

Leave a Comment