मुंबईत पोहोचताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले…
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज ब्रिटनमधून मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण आमदारांच्या अपात्रतेबाबत योग्य वेळेत व योग्य निर्णय घेणार, असे स्पष्ट केले आहे. 15 दिवसांतही हा निर्णय होऊ शकतो किंवा यासाठी वेळही लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार निर्णय होईल, मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असेही नार्वेकर यांनी सांगितले.