June 7, 2023
PC News24
सामाजिक

स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे ७ मुलींना वाचविण्यात यश,खडकवासला दुर्दैवी घटना

स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे ७ मुलींना वाचविण्यात यश,खडकवासला दुर्दैवी घटना
खडकवासला धरणात पोहायला गेलेल्या २ मुली बुडाल्याची एक दुर्दैवी घटना पुण्यात घडली.
स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे ७ मुलींना वाचविण्यात यश आले आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
गोऱ्हे खुर्द गावाच्या हद्दीत कलमाडी फार्म हाऊसजवळ खडकवासला धरणामध्ये पोहण्यासाठी 9 मुली पाण्यात उतरल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने या सर्व मुली पाण्यामध्ये बुडू लागल्या. सुदैवाने त्याच वेळी जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी पाण्यात धाव घेतली. यावेळी ९ पैकी ७ मुलींना वाचवण्यात यश आलं तर २ मुलीं धरणात बुडाल्या.

Related posts

“स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार” -एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

pcnews24

शहरात मृत झालेल्या जनावरांचे पुणे महापालिकेच्या नायडू पॉण्ड येथे दफन होणार

pcnews24

ओला,उबेर रिक्षा होणार बंद.. पुणेकरांसाठी चिंतेची बातमी.

pcnews24

भोसरी उद्यानातील सुविधा चालू करण्याची मागणी.

pcnews24

‘टी टाईम : 50 नॉट आऊट!’

pcnews24

ड्रोनची नजर असणार अनधिकृत बांधकामावर

pcnews24

Leave a Comment