दरोड्यातील कुख्यात आरोपींना काही तासातच मुद्देमाल व शस्त्रासह अटक.लातूर पोलिसांची कामगिरी.
लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पोलीस रात्रगस्त व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करण्याची मोहीम संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.तसेच कोंबिंग ऑपरेशन राबवून चोरी, घरफोडी करणाऱ्या आरोपींना, व फरार आरोपींना ताब्यात घेतले जात आहे.
दिनांक 14/05/ 2023 ते 15/05/2023 च्या मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास पोलीस रात्रगस्त सुरू असताना गस्तीवरील पोलिसांना माहिती मिळाली की, डी मार्ट जवळ असलेल्या एका अपार्टमेंट मधे दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून ऐवज चोरला आहे.मिळालेल्या माहितीची खातरजमा करून ती माहिती वायरलेस द्वारे तात्काळ वरिष्ठांना कळविली. त्यावरून पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जितेंद्र जगदाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, व रेनापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.डी. शिंदे. यांनी आपापल्या पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पेट्रोलिंग ला माहिती दिली. दरोडेखोर हे दरोडा टाकून रेनापुरच्या दिशेने पळून गेल्याची माहिती मिळताच त्यावरून रात्रगस्त करीत असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच चार्ली पेट्रोलिंग वरील पोलीस अंमलदार यांना तात्काळ बोलावून घेऊन त्यांचे पथके तयार केले. दरोडा टाकून रेनापुर च्या दिशेने पळून जाणाऱ्या दरोडेखोरांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तेव्हा दरोडेखोराने त्यांच्या ताब्यातील वाहन रस्त्यावर सोडून शेतात पळून गेले तोपर्यंत लातूर जिल्ह्यातील रात्रगस्तीवरील पोलीस वाहने अधिकारी व अंमलदार तसेच शिवारातील शेतकरी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते.
दरोडेखोर लपून बसलेल्या उसाच्या फडाला पोलिसांनी चोहोबाजीने वेळा घातला व दरोडेखोरांना वरील पथकामार्फत अतिशय शिताफिने ताब्यात घेण्यात आले. तरीही अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी पळून गेला असून पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत.
दरोडा घालून पळून जाण्याचे तयारीत असलेले आरोपी नावे– महेश आसाराम चव्हाण. (रा.कोल्हेर, तालुका गेवराई)नितीन संजय काळे उर्फ बापू टंग्या काळे. रा( बालमटकळी ता.शेगाव, जि अहमदनगर.)
आदेश उर्फ लाल्या शकील चव्हाण. (रा सालवडगाव, तालुका पैठण.) विकास रामभाऊ भोसले. राहणार उमापूर तालुका गेवराई जिल्हा बीड.. रवींद्र संजय काळे. राहणार बालमटाकळी तालुका शेगाव जिल्हा अहमदनगर.
या सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता कटावणी, लोखंडी टॉमी, मोठे मारतुल, 2 मोटार सायकली, तसेच दरोड्यात चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरोडेखोराकडे विचारपूस करून तपास करण्यात येत असून आतापर्यंत मिळालेल्या माहितीप्रमाणे दरोडेखोराने लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चोरीचे गुन्हे केल्याचे सांगत असून त्या दिशेने हे तपास सुरू आहे. वरील दरोडेखोरां कडून दरोड्यात चोरलेला जवळपास 14 तोळे सोन्याचे विविध दागिने तसेच 4,500/- रुपये रोख रक्कम असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. दरोडेखोरांनी पोलीस ठाणे रेणापूर हद्दीत जबरी चोरी, घरफोड्या तसेच लातूर शहरांमध्ये व जिल्ह्यात इतर ठिकाणी घरफोड्या चोऱ्या केल्याचे सांगितले असून दरोडेखोरां कडून जिल्ह्यातील आणखीन अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.या सर्व आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
लातूर पोलिसांनी समय सूचकता दाखवत अतिशय शिताफीने व आपसात ताळमेळ साधत गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे. उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे. यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, सुधाकर बावकर, सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार. सचिन द्रोणाचार्य, रामचंद्र केदार, उपनिरीक्षक मोरे शिवाजीनगर, पोलीस उपनिरीक्षक कवाळे. गांधी चौक, पोलीस उपनिरीक्षक देवकते. विवेकानंद चौक, महेश गळघट्टे, शैलेश जाधव स्थानिक गुन्हे शाखा, तसेच सहाय्यक फौजदार संजय भोसले पोलीस अमलदार राम गवारे, राजेंद्र टेकाळे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, योगेश गायकवाड. राजेश कंचे, बालाजी जाधव, सिद्धेश्वर जाधव, दीनानाथ देवकते तुराब पठाण, जमीर शेख, राजू मस्के, अंगद कोतवाड, सुधीर कोळसुरे, चालक पोलीस अंमलदार गोविंद जाधव, प्रदीप चोपणे, तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशन पोलीस अमलदार नागरगोजे, युवराज गिरी, बालाजी कोतवाड, काकासाहेब बोचरे, विवेकानंद पोलीस स्टेशनचे मुन्ना नलवाड, खंडू कलकत्ते, नारायण शिंदे, तसेच चार्ली मोटार सायकल पेट्रोलिंग वरील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.