४थ्या व ५व्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा हरियाणा २०२२-२३ पदक विजेत्या खेळाडूंची बक्षीस रक्कम खात्यावर जमा होणार
हरियाणा पंचकुला सन २०२२ मध्ये , व सन २०२३ मध्ये भोपाळ, मध्यप्रदेश येथे अनुक्रमे ४ थ्या व ५ व्या खेलो इंडिया युथ गेम्स पार पडल्या होत्या.यामध्ये महाराष्ट्र राज्यातील पदकविजेत्या खेळाडूंना सुवर्णपदक रु. ५ लक्ष, रौप्यपदक रु. ३ लक्ष व कांस्यपदक विजेत्यास रु. २ लक्ष तसेच सहभागी खेळाडूंना रु. ५० हजार यानुसार रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी जाहीर करण्यात आलेल्या रोख रक्कमेच्या पारितोषिकांची रक्कम थेट खेळाडूंच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी पदकविजेत्या व सहभागी खेळाडूंची बँक खात्याची विस्तृत माहिती देणे आवश्यक आहे.
क्रीडा संचालनालया कडे काही खेळाडूच्या बँक खात्याची विस्तृत माहिती जमा असून त्यामधील काही खेळाडूंनी सादर केलेली बँक खाती ही संयुक्त प्रकारातील तसेच पालकांच्या नावे आहेत. अशा खात्यावर निधी जमा करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने विलंब होऊन खेळाडूंच्या खात्यात बक्षीस रक्कम वेळेवर जमा होत नाहीत.
यास्तव ४ थ्या व ५ व्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये सहभागी तसेच पदकविजेत्या ज्या खेळाडूंची बँक खाती पालकांच्या नावे अथवा संयुक्त प्रकारातील आहेत, अशा खेळाडूंची राष्ट्रीयकृत बँकेत खेळाडूंच्या नावे नवीन खाते उघडून त्या बँक खात्याची माहिती व त्यासोबत रद्द केलेला चेक अथवा बँक खात्याचे डिटेल्स असलेल्या बँक पासबुकची प्रत व ज्या खेळाडूंनी स्वतःच्या खात्याची माहीती दिली आहे अशा बँक खाते क्रमाकांचा रद्द केलेला चेक अथवा बँक खात्याचे डिटेल्स असलेल्या बँक पासबुकची प्रत दि. १७ मे २०२३ पुर्वी कार्यासन क्रमांक ४ कडे विनाविलंब जमा करण्याची दक्षता घ्यावी.