भरधाव बसची दोन्ही चाकं निखळली, नक्की काय घडला प्रकार.
पुणे-नाशिक महामार्गावर धावणाऱ्या एसटी बसची मागची दोन्ही चाके निखळल्याची घटना घडली आहे. बसचे एक चाक बसच्या पुढे तर दुसरे चाक खोल ओढ्यात जाऊन पडले होते. बराच वेळ तीन चाकांवर तिरपी होऊन घासत धावत असलेली बस चालकाने प्रसंगावधान दाखवून थांबवली. त्यामुळे बसमधील 35 प्रवासी सुखरुप बचावले आहेत. आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी गावाजवळ हा प्रकार घडला. ही बस परेलवरुन नारायणगावकडे जात होती.