पहिली 2 वर्षे सिद्धरामय्या, नंतर शिवकुमार मुख्यमंत्रिपदी
येत्या 24 तासांत कर्नाटकातील मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. काल झालेल्या आमदाराच्या बैठकीत 85 आमदारांनी मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या यांना आणि 45 आमदारांनी डी. के. शिवकुमार यांना पाठिंबा दिल्याची माहिती आहे. यातूनच पहिली 2 वर्षे सिद्धरामय्या, तर अखेरचे 3 वर्षे डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री होतील, असा फॉर्म्युलाही तयार केला आहे. यावर आज दिल्ली बैठक होणार आहे.