नातीला भेटायला आलेल्या आजीची निर्घृण हत्या!!
सातारा जिल्ह्यातील कापडगावातील आजी नातीला भेटण्यासाठी पुणे जिल्ह्यातील थोपटेवाडी येथे गेली होती. त्यावेळी तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संगीता शरद करे (वय 50) असे मृत महिलेचे नाव आहे. महिलेच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नातीला भेटण्यासाठी महिला गेली होती. तिचा मृतदेह पाझर तलावाशेजारी आढळून आला. याप्रकरणी जावयाने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस तपास करत आहेत.