मराठी चित्रपट न दाखवल्यास 10 लाखांचा दंड
मराठी चित्रपटांना राज्यातील चित्रपटगृहांमध्ये स्क्रिन्स मिळत नसल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने याबाबत एक निर्णय घेतला आहे. एखाद्या चित्रपटगृहाने वर्षातील 4 आठवड्यांसाठी मराठी चित्रपट दाखवले नाही, तर परवाना नुतनीकरणावेळी त्या चित्रपटगृहाला 10 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच सिंगल स्क्रिन असलेल्या चित्रपटगृहांना तिकिटाची किंमत वाढवता येणार नाही.