जे. पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आजपासून दिड दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. उद्या ते पुण्यातील भाजपा प्रदेश कार्यसमितीच्या नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भाजपाने मागील काही दिवसांपासून मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कार्यक्रमांची आणखी केली. अनेक दिग्गज नेते मुंबईत आपले ठाण मांडून बसलेले आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी 2 वेळा मुंबईचा दौरा केला.