सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर
शिंदे सरकारची कॅबिनेट मंत्र्यांची काल बैठक झाली. या बैठकीत सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात सतत अवकाळी पाऊस पडत आहे. या निर्णयानुसार नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत.