टेस्लाचे अधिकारी येणार भारत दौऱ्यावर
अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या टेस्ला या कंपनीचे अधिकारी भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारतात टेस्लाचा व्यवसाय वाढवण्याबाबत या दौऱ्यात महत्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात. पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी व टेस्लाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होणार आहे. टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी ओळखली जाते. दरम्यान, या आधी इलॉन मस्क यांनी भारताच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणावर तसेच उच्च करांवर टीका केली होती.