मंथन फाउंडेशन व राष्ट्रीय विषाणू हिपॅटायटीस (काविळ बी आणि सी) नियत्रंण कार्यक्रम अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर
मंथन फाउंडेशन,
बी.जे.मेडिकल कॉलेज, ससून हॉस्पिटल,पुणे,
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था ,जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंण कक्ष पुणे व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार पेठ, पुणे येथे(दि.१६ मे )दि काविळ बी आणि सी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.या शिबिराचा लाभ एकुण ६०देहविक्री करणाऱ्या महिलांनी घेतला.
वायरल हिपॅटायटीस ही जगभरातील सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ओळखली जाते.भारतात असा अंदाज आहे की ४० दशलक्ष लोक हिपॅटाइटिस बी आणि सहा ते बारा दशलक्ष लोक हिपॅटायटिस सी ने ग्रस्त आहेत. हिपॅटायटीसशी लढा देणे आणि देशव्यापी २०३० पर्यंत समूळ उच्चाटन साध्य करायचे आहे. या कार्यक्रमात हिपॅटायटीस बी आणि सी संबंधित चे व्यवस्थापन मोफत औषधे आणि निदान केले गेले.
हिपॅटायटीस B आणि C असुरक्षित इंजेक्शन पद्धती आणि दूषित सिरिंज आणि सुया, संक्रमित रक्त आणि रक्त उत्पादने, लैंगिक संक्रमण, संक्रमित मातेकडून मुलामध्ये सामान्यतः यकृत आणि यकृताच्या कर्करोगाचा सिरोसिस होतो (50 ते 65% B आणि C संसर्गामुळे) होतो. एकूण हिपॅटायटीस मृत्यूच्या ९६% साठी हिपॅटायटीस बी आणि सी जबाबदार आहेत.
डॉ.महेंद्र केंद्रे राज्य समन्वयक NVHCP, सुधीर सरवदे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एड्स नियत्रंण व प्रतिबंध कक्ष पुणे,निलोफर ससून हॉस्पिटल, अमर चव्हाण सेतूचे प्रकल्प प्रतिबंधात्मक ऑफिसर पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
आशा भट्ट अध्यक्षा मंथन फाउंडेशन यांनी मार्गदर्शन केले. मंथन फाउंडेशन प्रकल्प व्यवस्थापक कविता सुरवसे यांनी शिबिराचे नियोजन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रुतिका यादव समुपदेशक व मंथन फाउंडेशन चे कार्यकर्ते सुवर्णा पवार, बाबू शिंदे तसेच रमा, मेरी, मोनिका, आयेशा, सारिका, अनिता, छाया, राधा, गीता, गयाबाई यांनी मेहनत घेतली.