देवेंद्र फडणवीसांची प्रकृती बिघडली
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेले प्रचारदौरे, सभांचा धडाका तसेच रणरणत्या उन्हात राज्याच्या अन्य भागांत झालेल्या प्रवासाच्या ताणामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडली आहे, अशी माहिती आहे. मंगळवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी मंगळवारचे सर्व कार्यक्रम रद्द करून सक्तीची विश्रांती घेतली. यामुळे मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीलाही ते उपस्थित राहू शकले नाही.