‘मी आत्महत्या करतोय, माझा शोध घेऊ नका’ नक्की काय प्रकार आहे ?
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी हे सोमवार पासून बेपत्ता झाले आहेत. “मी आत्महत्या करीत आहे, तानाजी कोळी याच्या फसवणुकीला कंटाळून निघून चाललो आहे. माझा शोध घेऊ नका ” असा मेसेज सोशल मीडियावर टाकून ते बेपत्ता झाले आहेत. माळी सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आपली पत्नी सुरेखा यांच्याशी शेवटचे बोलले आणि घरातून बाहेर गेले होते. त्यांचा शोध सुरु आहे.