पुणेकरांसाठी अलर्ट जारी
हवामान खात्याने पुणेकरांसाठी पुन्हा एकदा अलर्ट दिला आहे. पुणे शहर व परिसरात आकाश दिवसभर निरभ्र राहणार असून, या काळात उन्हाचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील काही दिवस शहरातील कमाल तापमान 38.5 सेल्सियस दरम्यान राहील. त्यामुळे उन्हाच्या चटक्यापासून वाचण्यासाठी पुणेकरांनी दुपारी बाहेर पडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे सांगण्यात आले आहे.