उपायुक्त जगतापांना कारणे दाखवा नोटीस.
पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जगताप यांनी एका खाद्यपदार्थाच्या स्टॉलवरील गॅसला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जगतापांवर कारवाईची मागणी केली होती. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी जगताप यांना नोटीस बजावली आहे. फर्ग्युसन रोडवर जगताप अतिक्रमण हटवण्याची कारवाई करत होते.