बैलगाडा शर्यतींवर आज ‘सुप्रीम कोर्टाचा’ निकाल
राज्यातील बैलगाडा शर्यतीच्या परवानगीबाबत आणि तामिळनाडूतील जलीकट्टू संदर्भात आज सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल देणार आहे. घटनापीठाने सुनावणीनंतर याबाबतची निकाल राखून ठेवला होता. डिसेंबर 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. त्यानंतर निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी झाली असून आज अंतिम निकाल आहे.