26/11 हल्ल्यातील आरोपी भारतात आणणार
मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणात 15 वर्षांनी भारताला मोठे यश आले आहे. 2008 च्या या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वर राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्याला भारतात आणण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यास तयार असल्याचे एनआयएने म्हटले आहे. पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातील राणाच्या भूमिकेची चौकशी एनआयएकडून सुरू आहे.