अरे बापरे,पिंपरी-चिंचवडमध्ये 401 अपघात !!!
पिंपरी-चिंचवडमध्ये 120 दिवसांमध्ये तब्बल 401 अपघातांची नोंद झाली. त्यावरून प्रत्येक दिवसाला तीनपेक्षा अधिक अपघात होतात, तर प्रतिदिनी एक मृत्यू होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले. अपघात होण्यास अति वेग हे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. सर्वाधिक अपघातांची संख्या ही पुणे-नाशिक महामार्गावर आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक 34 जणांचा मृत्यू झाला आहे, असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.