महाविकास आघाडीत नाराजीची ठिणगी
महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये लोकसभेसाठी 16-16-16 चा फॉर्म्युला ठरल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आल्याची चर्चा आहे. यावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप त्यांनी केला. तसेच बैठकीत न ठरलेले मुद्देही मुलाखतीत मांडल्याचा आरोपही त्यांनी केला.