December 11, 2023
PC News24
कथाकलाजिल्हाजीवनशैली

संस्कृत नाट्यांची पर्वणी,पुण्यात नाट्यानुकीर्तनम् महोत्सव.

संस्कृत नाट्यांची पर्वणी,पुण्यात नाट्यानुकीर्तनम् महोत्सव

दुर्मिळ आणि काहीशा दुर्लक्षित होत चाललेल्या संस्कृत सारख्या प्राचीन भाषेला पुनरुज्जिवित करण्यासाठी पुण्यातील ‘भरत नाट्य संशोधन मंदिर संस्थेने ‘नाट्यानुकीर्तनम्’ हा अनोखा उपक्रम आयोजित केला आहे.
दि १८ मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता संस्कृत एकांकीकांचा हा महोत्सव संपन्न होणार आहे.

संस्कृत भाषा देववाणी म्हणून संबोधली जाते. ती सर्व भाषांच्या जननी बरोबरच अनेकविध शास्त्रांचे भांडार देखील आहे. विपुल वाङ्गमयाचे वैभव लाभूनही काळाच्या ओघात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. देवधर्म, पोथ्या पुराणापर्यंतच तिला सीमित केले गेले. आणि कोणत्याही भाषेला पुनरुज्जीवित करायचे असेल तर नाट्यकले सारखे जनमानसात पोहोचणारे दुसरे उत्तम माध्यम नाही. मराठी नाट्यसंस्कृतीची जननी असलेल्या संस्कृत नाट्यांना उत्तेजन देण्यासाठी डॉ. रा.ना दांडेकर संस्कृत एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा यांसारख्या स्पर्धा आयोजित केल्या जातात मात्र प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळूनही त्यात सादर होणाऱ्या एकांकिका केवळ त्या स्पर्धेतील एका प्रयोगापुरत्याच मर्यादित राहतात. म्हणूनच स्पर्धेच्याही पलीकडे जाण्याचा दृष्टिकोन मिळावा या विचाराने प्रेरित होऊन आणि प्रेक्षकांच्या आग्रहाखातर भरत नाट्य मंदिर संस्थेने हा महोत्सव संपन्न करण्याचे योजिले आहे. पा महोत्सवामध्ये रसिकांना भरत नाट्य मंदिर संस्था निर्मित ‘सहवासिन्यः’, स. प. महाविद्यालय निर्मित सङ्गीतसौभद्रम् आणि महाराष्ट्र राज्य संस्कृत नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक विजेती, फर्ग्युसन महाविद्यालय स्वायत्त पुणे निर्मित एकांकिका यावच्चन्द्रदिवाकरी या तीन एकांकिकांचा समावेश आहे. ही एकांकिका पार्वतीबाई पेशवे ह्यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये यापूर्वी अशा प्रकारचा संस्कृत नाटकांचा महोत्सव आयोजित केला गेलेला नव्हता. ‘नाट्यानुकीर्तनम्’ या महोत्सवामुळे जवळपास ५० संस्कृत आणि नाट्यप्रेमी कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत आहे. आणि महोत्सवामध्ये सादर होणाऱ्या तीनही एकांकिका रोजच्या व्यवहारातील विषय हाताळणाऱ्या व अत्यंत सुलभ संस्कृत भाषेत लिहिल्या गेलेल्या असल्यामुळे जास्तीत जास्त रसिकांपर्यंत संस्कृत भाषा पोहोचू शकेल अशी प्रतिक्रिया संस्कृत आणि नाट्य प्रेमी वर्गात उमटताना दिसत आहे.

Related posts

एच. ए. मैदानावर रंगणार शिवपुत्र संभाजी” महानाट्य …११ ते १६ मे दरम्यान प्रयोग

pcnews24

3,000 रुपयांसाठी कॉम्प्युटर इंजिनियरची हत्या.

pcnews24

RSSची पुणे येथे 14 ते 16 सप्टे अखिल भारतीय समन्वय बैठक,डॉ. मोहनजी भागवत यांची उपस्थिती.

pcnews24

पुणे:शब्दसुरांचा अनोखा संगम.

pcnews24

शिवरायांची वाघनखं मायभूमीत परतणार

pcnews24

अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे हा:हा:कार 320 लोकांचा मृत्यू, अनेक जखमी

pcnews24

Leave a Comment