वाहन चालकाकडून पैसे घेतल्याने 2 पोलीस निलंबित
पुण्यात एका वाहन चालकाकडून पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन 2 वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. बाळू दादा येडे आणि गौरव रमेश उभे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे दोघे कर्मचारी स्वारगेट वाहतूक विभागात कार्यरत होते. पैसे घेतानाचा त्यांच्या व्हिडिओ व्हायरल होत आहे. वाहन चालकावर कोणतीही कारवाई न करता पैसे घेतल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.