अतिक्रमण हटवण्याचे काम करताना महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण
कृष्णानगर चौक ते साने चौक चिखली येथे
अतिक्रण हटविण्याचे काम सुरू असताना महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकऱणी एका महिलेवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी घडला आहे.
अतिक्रण कारवाई पथकातले महेंद्र जागोबाजी चौधरी (वय 57) यांनी चिखली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून महिलेवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
वाहन चालकाकडून पैसे घेतल्याने 2 पोलीस निलंबित (व्हिडिओ सह)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी पथकासह परिसरात अतिक्रमण हटवण्याचे काम करत होते. यावेळी तेथे बंदोबस्तासाठी हजर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली.तसेच हात पिरगाळणे, हातावर ओरखडे घेत त्यांचा धक्काबुक्की करत जखमी केले. यावरून महिला आरोपीवर सराकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.