December 11, 2023
PC News24
गुन्हापिंपरी चिंचवड

क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक.

क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक
मोशी ,बोऱ्हाडेवाडी येथील एका महिलेची क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 27 लाख 500 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना 18 मार्च ते 29 मार्च या कालावधीत घडली.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार +62 85760134280 या क्रमांकावरून व्हाटसअप, तसेच टेलिग्राम वरून अर्पिता नाव सांगून बोलणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अनोळखी महिलेने फिर्यादीस व्हाटसअप आणि टेलिग्राम या सोशल मिडीयावर मेसेज करून क्रिप्टो करन्सीमध्ये शॉर्ट प्रिपेड प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.हळूहळू फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांचा ट्रेड चुकल्याचे सांगत दंड, इनकम टॅक्स अशी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून 27 लाख 500 रुपये घेत फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस आधिक तपास करीत आहेत.

Related posts

पिंपरी चिंचवडची कन्या बनली महाराष्ट्र क्रिकेट संघाची कर्णधार.

pcnews24

भोसरी येथील कंपनीत शॉपचा पत्रा उचकटून जॉब चोरी.

pcnews24

घरफोडी गुन्ह्यातील सराईत आरोपींना अटक,सर्व अटक आरोपी पिंपरी चिंचवडमधील.

pcnews24

..आणि इमारती हादरल्या…सर्वात भयंकर मोठी दुर्घटना टळली! ताथवडे गॅस घटना ..आरोग्यमंत्री तानाजी सावंत घटनास्थळी दाखल पोलिसांना फटकारले!

pcnews24

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे पिंपरी चिंचवड शहरात आयोजन, एकूण २२ ठिकाणी कार्यक्रम.

pcnews24

पिंपरी चिंचवड: महापालिका प्रशासनाकडून अखेर बेकायदा रुफटॉप हॉटेलवर कारवाईस सुरूवात.

pcnews24

Leave a Comment