कोर्टाच्या आवारात सुनेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न
बीडच्या शिरूरमध्ये सासरचे लोक छळ करत असल्याने त्यांच्याविरुद्ध आई वडीलांनच्या घरी राहून कायदेशीर लढाई विवाहिता लढत होती. यावरुन, कोर्टात दाखल असलेला खटला मागे घेत नसल्याच्या रागातून विवाहितेला तिच्या सासरच्या मंडळींनी कोर्टाच्या परिसरात डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी सासू-सासरा व नवऱ्याविरोधात शिरूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी महिलेवर दवाखान्यात उपचार सुरु आहे.
अतिक्रमण हटवण्याचे काम करताना महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण