सुषमा अंधारे यांंना कानशिलात,उठाशि गटातील जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना कानशिलात मारल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. त्यावरुन त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेच्या सभेच्या स्टेजची पाहणी करताना ठाकरे गटातील उपजिल्हाप्रमुख व जिल्हाप्रमुख यांच्यात वाद झाला होता. यातून धक्काबुक्कीही झाली. दरम्यान, अंधारे यांनी ही शिंदे गटाची स्क्रिप्ट असल्याचे म्हटले आहे.