कोयत्याच्या धाकाने नागरिकांना लुटणारी टोळी वाकड पोलिसांनी पकडली
वाकड हिंजवडी परिसरात नागरिकांना शस्त्राच्या धाकाने लुटणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी जेर बंद केले
वाकड, हिंजवडी परिसरात कोयत्याच्या (Wakad)
या टोळीकडून एक लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड स्मशानभूमीजवळ अंधारात काहीजण संशयितपणे थांबले असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता पाचहीजण पोलीस रेकोर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात तीन आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी पाचही जणांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख 60 हजारांचा ऐवज जप्त केला आहे
प्रमोद दयानंद कांबळे (वय 21, रा. रहाटणी), प्रफुल्ल राजू वाघमारे (वय 21, रा. थेरगाव), पवन शहादेव जाधव (वय 21, रा. रहाटणी), रोहित उर्फ बॉंड राहुल शिंदे (वय 19, रा. रहाटणी), राहुल कॅप्टन मोरे (वय 20, रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
. आरोपी रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या लोकांना कोयत्याने मारहाण करून लुटत होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदू गिरे, संतोष बर्गे, संदीप गवारी, दीपक साबळे, स्वप्नील खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, प्रशांत गिलबिले, अजय फल्ले, तात्या शिंदे, कौंतेय खराडे, भास्कर भारती, स्वप्नील लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घारगे, रमेश खेडकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.