सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.
सोन्याच्या दरात गेल्या तीन दिवसांपासून 1000 रुपयांनी घसरण झाली आहे. आज 330 रुपयांनी सोन्याचे भाव कमी झाले असून मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅमसाठीचे आजचे भाव 60870 रुपये आहेत. तर दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याचे भाव 55800 रुपये आहेत. चांदीच्या भावातही 200 रुपयांची घसरण झाली आहे. मुंबईत आज चांदीचे भाव 74300 रुपये किलो आहेत. तर गेल्या तीन दिवसांत चांदी किलोमागे 800 रुपयांनी स्वस्त झाली आहे.