December 11, 2023
PC News24
अपघातठळक बातम्यापिंपरी चिंचवड

निष्काळजीपणे हॅन्ड ब्रेक न लावता कार कंटेनर पार्क केला आणि पुढे घडला अनर्थ

निष्काळजीपणे हॅन्ड ब्रेक न लावता कार कंटेनर पार्क केला आणि पुढे घडला अनर्थ
हॅन्डब्रेक न लावलेला कंटेनर रिव्हर्स आल्याने त्या खाली एका चिरडून तरुणाचा मृत्यू झाला…
हा कार कंटेनर निष्काळजीपणे हॅन्ड ब्रेक न लावता रस्त्याच्या कडेला पार्क केले होते. मात्र हा कंटेनर रिव्हर्स येवून त्याखाली चिरडून एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा धक्कादायक प्रकार मोशीतील क्रांती चौक येथे दि.18 गुरुवारी घडला आहे.
हा कार कंटेनर (एन.एल.01 के 2051) हा रिव्हर्स आला. काही कळण्याच्या आत सोनावणे यांना धडक लागली व ते खाली पडले. त्यांच्या डोक्यावरून कंटेनरचे मागचे चाक गेले यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कंटेनर चालक सुबोध नारायण शिरोळे (वय 53 रा.मोशी) याला अटक केली आहे. तर विकास नानाभाऊ सोनवणे (वय 35 रा.नेहरुनगर, पिंपरी) अये मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुर्यकांत नानाभाऊ सोनावणे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास सोनावणे हे चहा पिऊन पायी जात असताना त्यांच्या अंगावर

आरोपी शिरोळे याने त्याच्या ताब्यातील कंटेनर हे हॅन्डब्रेक न लावताच निष्काळजीपणे रस्त्याच्या कडेला पार्क केले होते. त्यामुळे कंटेनर अचानक रिव्हर्स गेला ज्यात सोनावणे यांना आपला जिव गमवावा लागला. पोलिसांनी चालकाला अटक केली असून एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related posts

पोहण्यासाठी गेलेल्या एका अभियांत्रिकी तरुणाचा बुडून मृत्यू

pcnews24

पिंपरी:नियमित जनसंवाद सभेचे नियोजन कार्यरत.

pcnews24

बिजली नगर चिंचवड परिसरातील हरितपटा नामशेष होण्याच्या मार्गावर,सखोल चौकशीची मागणी

pcnews24

क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या पाच बुकिंना घेतले ताब्यात ,चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटीच्या बंद फ्लॅटमध्ये होता सट्टा सुरू.

pcnews24

नवले ब्रीज ठरतोय Accident point.स्वामीनारायण मंदिर येथे भीषण अपघात

pcnews24

अपघाताचा ‘root cause’ समजला आहे – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

pcnews24

Leave a Comment