माझ्या चुकांमुळे मला हटवले नाही – रिजीजू
केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजीजू यांना पदावरून हटवून दुसरे मंत्रालय देण्यात आले आहे. रिजीजू यांनी योग्य कारभार सांभाळला नाही, अशी त्यांच्यावर टीका होत असताना रिजीजू यांनी माझ्या चुकांमुळे मला पदावरून हटवले नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेरबदल करत मला नवीन जबाबदारी दिली आहे, ही माझ्यासाठी शिक्षा नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान रिजीजू यांनी शुक्रवारी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा कारभार स्वीकारला.