March 1, 2024
PC News24
गुन्हापिंपरी चिंचवड

चिखलीतील एका महिलेला नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाईनच्या नादात 13 लाखांची फसवणूक

चिखलीतील एका महिलेला नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाईनच्या नादात 13 लाखांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे सध्या वेगवेगळ्या लिंक त्यावर दाखवली जाणारी आमिषे, त्यावरून रिकामी होणारे बँक अकाऊंट अशी दिवसाला एक तरी तक्रार दाखल होत आहे. यात नागरिकांना लाखोंचा गंडा घालण्यात येत आहे. चिखलीतील एका महिलेलाही नोकरीचे आमिष दाखवत लिंक पाठवली त्यात वेगवेगळे टास्क सांगत महिलेच्या खात्यावरून 9 लाख व टास्कची रक्कम असा एकूण 13 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार 3 एप्रिल ते 5 एप्रिल 2023 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी गुरुवारी (दि.18) चिखली पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली असून पोलिसांनी प्रकाश दास, तीन महिला आरोपी व विविध बँक खातेधारक अशा 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना नोकरीचे आमिष दाखवून आरोपींनी विविध लिंक त्यांना पाठवून त्या उघडण्यास सांगितल्या. लिंक ओपन केली त्यात टास्क दिले जायचे त्यानुसार टास्क करत असताना आरोपींनी टास्क द्वारे महिलेकडून 9 लाख 75 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. तसेच फिर्यादी यांच्या नफ्याची रक्कम परत न देता त्यांनी एकूण 13 लाख 45 हजार 500 रुपयांची फसवणूक केली आहे. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून नागरिकांनी अशा भूलथापांना बळू पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे अशा स्कॅमला उच्च शिक्षीत तरुण- तरुणी बळी पडत आहेत.

Related posts

देश : कोलकाता : ‘सरोगेट मदर’ च्या माध्यमातून बालक विक्रीचे रॅकेट.

pcnews24

संगनमत करून अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले.. ‘बालविवाह प्रतिबंधक’ कायद्या अंतर्गत 15 ते 16 जणांविरोधात गुन्हा दाखल

pcnews24

पुणे:पोलीस अधीक्षक तुषार दोषींची बदली !!

pcnews24

मुलीला मारहाण करीत असताना वडिलांनी मध्यस्थी केल्यामुळे त्यांना जावयाकडून मारहाण

pcnews24

अदानींविरोधात पुरावे काय आहेत ?

pcnews24

मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल किशोर आवारे हत्याप्रकरण

pcnews24

Leave a Comment