March 1, 2024
PC News24
पिंपरी चिंचवडमहानगरपालिकासामाजिक

“मेरी लाईफ,मेरा स्वच्छ शहर” उपक्रमा अंतर्गत “RRR केंद्र” स्थापन होणार..

“मेरी लाईफ,मेरा स्वच्छ शहर” उपक्रमा अंतर्गत “RRR केंद्र” स्थापन होणार..

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे “मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर” या केंद्र शासन नियोजित उपक्रमा अंतर्गत आपल्या प्रभागात “RRR केंद्र” स्थापन करण्यात येणार आहे.
“रिड्यूस, रियुज आणि रिसायकल (RRR)” सेंटर्स म्हणजेच RRR केंद्रे स्थापन करणे आणि या संकलित केलेल्या वस्तू नूतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादने तयार करण्यासाठी विविध भागधारकांना सुपूर्द करणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे.
शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लॅस्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी

“RRR केंद्राचे उद्घाटन २० मे, २०२३ शनिवार रोजी सकाळी ०७:०० वा.ज्योतिबा गार्डन काळेवाडीयेथे होणार आहे.या केंद्राचा कालावधी
२० मे, २०२३ ते ५ जून, २०२३ तरी सदर उद्घाटन समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. उद्घाटन समारंभ आणि केंद्र कालावधी मध्ये देखील आपले चांगले सहकार्य लाभेल, ही अपेक्षा आहे. आपणा कडून जास्तीत जास्ती प्रमाणात जुन्या व वापरण्या योग्य वस्तू (ज्या कचरा नाहीत आणि आपण स्वतः वापरत नाहीत) या इकडील केंद्रामध्ये जमा करण्यात याव्यात.
RRR केंद्राचा उद्देश:
सदर गोळा केलेल्या साहित्याचे लॉगबुक रेकॉर्डस् देखील ठेवले जाणार आहे.
काय देऊ शकता
* जुने कपडे
* जुने चप्पल/बूट
* जुने खेळणे
* जुने इलेक्ट्रॉनिक/ वस्तू
* वापरात नसलेली भांडी
* जुने बुक्स्
* जुने रद्दी पेपर
सर्व नागरिक, सर्व बचत गट, सर्व स्थानिक लीडर, सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, स्वयम् सेवी संस्था , एन जी ओ यांच्या सहभागातून हा उपक्रम चांगल्या पध्दतीने राबवला जाऊन याचे कायम स्वरूपात आणि शाश्वत केंद्रात रूपांतर होईल अशी महापालिकेस खात्री आहे.

Related posts

पि.चि.महापालिकेच्या वतीने संविधान दिन साजरा- नागरिक आणि अधिकारी,कर्मचा-यांनी केले सामुहिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन.

pcnews24

जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी ग्रामपंचायतीला विशेष पंचायत पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव..

pcnews24

शहरात मृत झालेल्या जनावरांचे पुणे महापालिकेच्या नायडू पॉण्ड येथे दफन होणार

pcnews24

स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे ७ मुलींना वाचविण्यात यश,खडकवासला दुर्दैवी घटना

pcnews24

लिंडा याकोरिनो ट्विटरच्या नवीन CEO ?

pcnews24

वारजे येथे रस्त्याच्या कडेला सापडली दोन दिवसांची बेबी गर्ल

pcnews24

Leave a Comment