2,000 रुपयांच्या नोटा होणार बंद
भारतीय रिझर्व्ह बँकेने 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून हळू हळू कमी करून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत त्या बँकेतून बदलून घेण्यास सांगितले आहे. RBI ने ट्विट करून ही बातमी दिली आहे.तसेच दोन हजार रुपयांच्या नोटा मात्र कायदेशीर निविदा राहील, असेही म्हंटले आहे.
एका वेळी २००० च्या दहा नोटा म्हणजेच वीस हजार रुपये बदलून मिळतील असे सांगण्यात आले आहे.
सर्वसामान्य जनतेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. आम्ही २००० च्या नोटांचा वापरच करीत नाही अश्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात, मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे, की ” भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ‘स्वच्छ नोट धोरण’च्या अनुषंगाने, 2000 मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2000 च्या नोटा कायदेशीर निविदा राहतील. तसेच नोटा बदल करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यासाठी सर्व बँकांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत दोन हजारच्या नोटांसाठी ठेव किंवा विनिमय सुविधा उपलब्ध करून द्यावी.”या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना, RBI ने म्हटले आहे, की “सुमारे 89 टक्के 2000 मूल्याच्या नोटा मार्च 2017 पूर्वी जारी केल्या गेल्या होत्या. चलनात असलेल्या या नोटांचे एकूण (RBI) मूल्य 31 मार्च 2018 रोजी 6.73 लाख कोटींवरून 31 मार्च 2018 रोजी (प्रचलित नोटांच्या 37.3%) शिखरावर 3.62 लाख कोटीवर घसरले आहे. 31 मार्च 2023 रोजी चलनात असलेल्या नोटांचे मूल्य केवळ 10.8% आहे. इतर मूल्यांच्या नोटांचा साठा लोकांच्या चलनाची गरज भागवण्यासाठी पुरेसी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.”