श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा,तर मोरया गोसावी देवस्थानासाठी निधी.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थान परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय या बैठकीत झाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.