November 29, 2023
PC News24
जिल्हाठळक बातम्याराजकारण

शरद पवार यांची डीपीडीसीच्या (पुणे) बैठकीला अनपेक्षितपणे हजेरी

शरद पवार यांची डीपीडीसीच्या (पुणे) बैठकीला अनपेक्षितपणे हजेरी

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डीपीडीसीची बैठक झाली. तर या बैठकीला अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी हजेरी लावून आश्चर्ययाचा धक्का दिला. बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह जिल्हय़ातील आमदार आणि अधिकारी उपस्थित होते.

शरद पवार यांनी बऱ्याच वर्षानंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, मी अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. पण मी पहिल्यांदा पवार साहेबांना डीपीडीसीच्या बैठकीला आल्याचे पाहिले आहे.

त्यावर मी सुप्रियाला विचारले असता ती म्हणाली,काही नाही केवळ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काम कसं चालत आहे ते पाहण्यास पवार साहेब आले आहेत. शरद पवार यांनी केवळ ऐकण्याची भूमिका घेतली. ते काही अधिक बोलले नसल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील विचारले असता ते म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला शरद पवार आल्याचे पाहून आश्चर्य वाटले. शरद पवार यांनी एवढा वेळ पुणे जिल्ह्यातील जनतेला दिला ही खूप आनंदाची गोष्ट आहे.आपण बैठक लवकर संपवू, पण त्यावर पवारसाहेब म्हणाले मला अजिबात घाई नाही. त्यानंतर ती बैठक जवळपास दोन तास चालली. तसेच शरद पवार बैठकी करीता आल्याने आश्चर्यची आणि आनंदाची गोष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related posts

जाहिरातीच्या वादानंतर फडणवीस म्हणाले…

pcnews24

G-20 परिषदेच्या थेट प्रक्षेपणाची जबाबदारी प्रमोद दाभोळे या मराठमोळ्या युवकावर; भारतानं टाकला विश्वास! मीडिया कोऑर्डिनेटर म्हणून निवड

pcnews24

आळंदी ग्रामीण भागात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला.

pcnews24

लंडन मध्ये राज्याभिषेकावेळी झळकले ‘नॉट माय किंग’ पोस्टर

pcnews24

पिंपरी-चिंचवड आम आदमी पार्टी कार्यकारिणी जाहीर

pcnews24

मराठा समाजाने टोकाचे पाऊल उचलू नये. आपल्या परिवाराचा विचार करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन.

pcnews24

Leave a Comment