लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार ?
राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे, त्यामुळे दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नागपूर दौरा आटोपून तातडीने अवघ्या काही तासांसाठी नवी दिल्लीला जावून आले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास ते पुन्हा नागपुरात परतले. फडणवीसांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत हायकमांडसोबत चर्चा केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.