हाणामारी ! वकील महिला-पुरुष कोर्टातच भिडले(व्हिडिओ सह)
दिल्लीतल्या रोहिणी कोर्टाच्या परिसरात महिला आणि पुरुष वकिलांमध्ये हाणामारी झाली आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये दोन्ही वकिल एकमेकांना कानशिलात मारताना दिसत आहेत. कोणीही त्यांच्यात मध्यस्थी करताना दिसत नाही. मी कोर्टाच्या परिसरात कामात असताना वकील विष्णू कुमार शर्मा यांनी मला मारहाण केली, असा आरोप महिला वकील नेहा गुप्ता यांनी केला. तसेच त्यांनी या प्रकरणी तक्रारही दाखल केली आहे.