सिटी ऑफ ड्रिम्स -३,२६ मे रोजी प्रदर्शित होणार !
अभिनेत्री प्रिया बापट ही तिच्या ‘सिटी ऑफ ड्रिम्स – 3’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. प्रिया, सचिन पिळगावकर व अतुल कुलकर्णी या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. 26 मे रोजी ही सीरिज प्रदर्शित होत आहे. प्रिया या चित्रपटात राजकारणी असलेल्या पौर्णिमा गायकवाडचे पात्र साकारत आहे. हे पात्र आजच्या राजकीय नेत्यांशी मिळते जुळते नाही, त्यामुळे हे पात्र साकारण्यासाठी मी खेळाडूंकडून प्रेरणा घेईन, असे प्रिया म्हणाली.