जबरी चोरी व घरफोडी करणारी आंतर राज्यीय टोळी जेरबंद
आरोपींकडून एकूण 36 गुन्हे उघडकीस व 35,83,300 /- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त
पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या चैन स्नॅचिंग व घरफोडी-चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे बाबत तसेच चैन स्नॅचिंग व घरफोडी-चोरीसह इतर मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने विशेष मोहिम राबविण्याच्या सुचना दिल्या होत्या.
पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर यांनी दिले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, महादेव वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, विनायक सपाटे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात घडले चैन स्नॅचिंग व घरफोडी-चोरीचे गुन्ह्यांचे ठिकाणी भेटी देवून गुन्हा केल्याची पध्दत व तांत्रिक दृष्ट्या तपास करून तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करून मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेकरीता विशेष पथक तयार केले.
श्रीमती लता पांडुरंग म्हातुगडे, व. व. 53, रा. 2038, माने गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर यांचे गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने चोरून नेले. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 22/2023, भा.द.वि.स. क. 392 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे व पोलीस अंमलदार नितीन चोथे यांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार दिपू जगन्नाथ डफाळे, रा. बेळगाव, ता. जि. बेळगाव, राज्य-कर्नाटक याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असून सदरचे आरोपी दि. 04.05.2023 रोजी परत पल्सर मोटर सायकल वरून कर्नाटक राज्यातून चेन स्नॅचिंग करणे करीता कोल्हापूर जिल्ह्यात येणार असल्याचे गोपनियरित्या खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पथकातील पोलीस अमंलदार यांनी बेळगांव ते पुणे जाणारे रोडवर लक्ष्मीटेकडीचे जवळ सापळा लावून आरोपी नामे नितेश उर्फ दिपू जगन्नाथ डफाळे, व.व. 37, रा. प्लॉट नं. 38, चंद्र माऊली कॉलनी, रूक्मिणीनगर, बेळगाव, ता. जि. बेळगाव, राज्य कर्नाटक व शुभम सुनिल सुर्यवंशी, व. व. 19. रा.आर.पी.डी. कॉलेज रोड, दुसरे गेट जवळ, बेळगाव, ता. जि. बेळगांव, राज्य-कर्नाटक यांना त्यांचे कब्जातील चोरीचे पल्सर मोटर सायकलसह पकडले. प्राथमीक तपासात त्यानी जुना राजवाडा पोलीस ठाणे कडील गु.र.नं. 22/2023, भा.द.वि.स. क. 392 प्रमाणे दाखल गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक चौकशी करुन त्यांचा साथीदार उमेश उर्फ लिंगराज रामेगौडा, व. व. 35, रा. जमनटळ्ळी, ता. सकलेशपूर, जि. हासन, राज्य-कर्नाटक उर्फ कृष्णा अशोक तलवार, रा. हुबळी, ता. धारवाड, राज्य- कर्नाटक यास देखील ताब्यात घेतले. नमुद आरोपीत यानी जुना राजवाडा पोलीस ठाणेकडील जबरी चोरीचे गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करुन त्यांची दि. 11.05.2023 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेवून त्यांचेकडे सखोल तपास केला.
या तपासामध्ये 01 ) नितेश उर्फ दिपू जगन्नाथ डफाळे हा सिव्हील इंजिनिअरचे शिक्षण घेत असताना तो अमंली पदार्थाचे आहारी गेला व
02|शुभम सुनिल सुर्यवंशी, 03 उमेश उर्फ लिंगराज रामेगौडा हे त्यांचे इतर साथीदार व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये घरफोडी चोरीचे गुन्ह्यात अटक केलेले आरोपी नामे 04/राजू सल्वराज तंगराज, रा.कारगल. ता. सागरा, जि. शिमोगा व 05) भिमगोंडा मारुती पाटील, रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर या सर्वांनी मिळून स्वतःचे अर्थिक लाभ व चैनी करीता पैसे उपलब्ध करणे करीता बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगून लोकांचे अपहरण करून त्याना मारहाण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी चोरी मोटर + सायकलवरुन चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणे यासह अंमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री करून चैनी करणे हा त्यांचा नित्याचा व्यवसाय बनला व त्यातुनच टोळीने महाराष्ट्रसह कर्नाटक व गोवा राज्यात गुन्हे केलेचे निदर्शनास आले आहे.
वरील आरोपींचे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये त्यांचेकडे एकत्रीत रित्या कौशल्यपूर्व तपास व चौकशी केली. तपासामध्ये नमुद आरोपी यांनी आज पावेतो केलेल्या सदर गुन्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यात 12 गुन्हे, कर्नाटक राज्यात 05 गुन्हे असे चेन स्नॅचिंगचे एकूण 17 गुन्हे, घरफोडी चोरीचे कोल्हापूर जिल्ह्यात 14 गुन्हे, सोलापूर जिल्ह्यात 01 गुन्हा व कर्नाटक राज्यात 02 गुन्हे असे घरफोडी चोरीचे एकूण 17 गुन्हे, बेकायदेशीर 9 mm पिस्टलचे 24 जिवंत राऊंड व एक मॅगझिन कब्जात बाळगलेबाबत 01 गुन्हा तसेच पल्सर मोटर सायकल चोरीचा 01 गुन्हा असे एकूण 36 गुन्हे उघडकीस आले आहेत.
नमुद आरोपीकडे तपास करुन त्यांचेकडून उघडकीस आलेले गुन्ह्यातील चोरीस गेलेले एकूण 311 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, चोरीची पल्सर मोटर सायकल एक, बेकायदेशीर 9 mm पिस्टलचे 24 जिवंत राऊंड व एक मॅगझिन, चोरीचे दागीने विक्री करुन त्यामधून मिळालेले पैसातून खरेदी केलेली एक क्रेटा गाडी व गुन्हा करणेकरीता वापरलेली एक अॅक्सेस मोटर सायकल असा एकूण 35.83.300/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून अद्यापही सदर आरोपीत यांचेकडे तपास सुरु असून त्यांचेकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागीने हस्तगत करणेची प्रक्रिया सुरु आहे. त्यांचेकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
तसेच यातील आरोपी उमेश रामेगौडा हा कर्नाटक राज्यातील खुन व खुनाचा प्रयत्न अशा दोन गुन्ह्यांमध्ये वॉरंट मध्ये पाहिजे आरोपी असल्याने तो कृष्णा अशोक तलवार या बनावट नावाने वावरत होता
असे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक आरोपींचे विरुद्ध खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.आरोपीचे नांव व दाखल गुन्ह्यांची संख्या
१)नितेश उर्फ दिपू जगन्नाथ डफाळे(46)
२)उमेश उर्फ लिंगराज रामेगौडा(22)
३)राजू सल्वराज तंगराज (64)
४)भिमगोंडा मारुती पाटील(37)
५)शुभम सुनिल सुर्यवंशी(19)
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, श्री. शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक, सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, विनायक सपाटे तसेच पोलीस अंमलदार नितीन चोथे, प्रकाश पाटील, विनायक चौगुले, हरीष पाटील, खंडेराव कोळी, शिवानंद मठपती, कृष्णात पिंगळे, संजय कुंभार, संजय हुंबे, तुकाराम राजीगरे, सोमराज पाटील, सागर कांडगांवे, संजय पडवळ, अनिल पास्ते, संतोष पाटील, रफिक आवळकर व राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे..