करोडो मराठा जोडणारे युवा प्रवीण पिसाळ यांचे निधन
World Maratha Organization ची स्थापना करणारे प्रवीण पोपटराव पिसाळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. मराठा आरक्षण आंदोलन तीव्र होत होते, या काळात त्यांनी world Maratha Organization ची स्थापना केली होती, या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांना रोजगारासाठी मार्गदर्शन आणि मदत देखील केली होती. WMO सोबत ऑनलाईन खास करुन फेसबूकवर एक कोटी मराठा जोडले गेले होते.