स्वातंत्र्यवीर सावकरांच्या जन्मदिनी 28 मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार नव्या संसदेचे उद्घाटन
अलीकडच्या काळात स्वातंत्र्यवीर सावकर यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून विशेषतः राहुल गांधी यांच्याकडून विरोध होताना पाहायला मिळाला. तर सावकरांना भारतरत्न मिळावा म्हणून सावरकर प्रेमींची मागणी नेहमीच अग्रेसर राहिली आहे. शिवसेना UBT तर राहुल गांधी यांनी सावरकरांच्या केलेल्या अपमानावरून व हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सावरकराना BJP भारतरत्न का देत नाही असा सवाल करत असते.
28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या संसदेचं उद्घाटन होणार आहे. हा योगायोग नसून यामागे काहीतरी कारण असल्याची चर्चा सुरू आहे. भाजप पक्ष नेहमीच सावरकर प्रेमी म्हणून ओळखला जातो. त्यात काँग्रेसचा टोकाचा सावरकर विरोध पाहता स्वातंत्र्यवीर सावकरांच्या जन्मदिनी मुद्दाम ही तारीख निवडल्याची चर्चा सध्या सुरू आहे.नव्या भारताची ताकद दर्शवणाऱ्या नव्या संसदेच्या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे आणि हा सावरकरांना अनोखा सन्मान ठरणार आहे.