सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल,महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्था प्रकल्पातील घटना.
बांधकाम प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा मोबाईल हिसकावून घेऊन त्यांच्याबरोबर गैरवर्तन करणार्या महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना (Maharashtra Police Mega City) संस्थेचे संचालक, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश भामरे (Retired ACP) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
स्वातंत्र्यवीर सावकरांच्या जन्मदिनी 28 मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार नव्या संसदेचे उद्घाटन
हा प्रकार लोहगाव येथील महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्थेच्या जागेत गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्थेचा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. संचालक मंडळावर आरोप प्रत्यारोप होत आहेत.फिर्यादी या बांधकाम प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्या बांधकामाचे शुटिंग करीत होत्या.तेव्हा भामरे यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. फिर्यादीचा हात पकडून फिर्यादी यांच्या गालाला स्पर्श करुन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.याबाबत येरवडा येथील एका ४४ वर्षाच्या महिलेने विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २४४/२३) दिली आहे. त्यावरुन सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश भामरे यांच्यावर विनयभंगाचा आणि अश्लिल शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल केला आहे.पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता माळी आधिक तपास करीत आहेत.