मुंबई मध्ये ४,३०० आमदारांनची वर्णी,काय आहे प्रकार?
पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित ‘राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत’ मुंबई येथील बीकेसी जिओ सेंटरमध्ये 15 ते 17 जून या काळात होत आहे. या कार्यक्रमाला 7 देशातील 4,300 आमदार एकत्रित येणार आहेत, अशी माहिती रामराजे निंबाळकर यांनी दिली आहे. भारताच्या लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, मनोहर जोशी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे या संमेलनाचे मार्गदर्शक आहेत.