२००० रूपये नोटे संदर्भातले आरबीआय तर्फे विविध पर्याय
– ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, ते 2000
रुपयांच्या नोटा बँक खात्यात जमा करू शकतात.
– बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्याबाबत
कोणतेही निर्बंध नाहीत.
• 23 मे 2023 पासून नोटा बदलता येतील.
– 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा बदलू शकता.
• आरबीआयने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करू नयेत असे सांगितले.
नोटा बदलण्यासाठी ओळखपत्राची गरज नाही भारतीय रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबरनंतर 2000 च्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता या संदर्भातली नियमावली वेळोवेळी बँकांकडून जाहीर करण्यात येत आहे. दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही फॉर्मची किंवा कोणत्याही ओळख प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचं एसबीआयनं सांगितलं आहे. एसबीआयकडून आपल्या सर्व मंडळांच्या मुख्य कार्यालयांना पत्र पाठवण्यात आले आहे.