‘रत्नागिरीत पुन्हा प्रयोग करणार नाही’ अभिनेता भरत जाधव
सध्या ‘तू तू मी मी’ या नाटकाचे राज्यात प्रयोग करत आहे. रत्नागिरीत काल (20 मे) प्रयोग होता. यावेळी नाट्यगृहातील AC बंद होता. तसेच फॅनदेखील नव्हते. नाट्यगृहाची स्वतःची साऊंड सिस्टिम नसल्याने कलाकारांना त्रास सहन करावा लागला आहे. तसेच प्रेक्षकांना देखील प्रचंड उकाड्यात हे नाटक पाहावे लागल्याने भरत जाधव प्रचंड संतापला व या प्रयोगानंतर रत्नागिरीत पुन्हा प्रयोग करणार नाही, असे म्हणाला.