December 11, 2023
PC News24
गुन्हाराज्य

दारू पिऊन कुटुंबाला मारहाणकरांना वडिलांचा खूप

दारू पिऊन कुटुंबाला मारहाणकरांना वडिलांचा खूप

दिनांक २०/०५/२०२३ रोजी सौ. माधुरी जगताप रा. तरोडा यांनी पोलीस स्टेशन कुन्हा येथे प्रभाकर जगताप यांचे शेतात कोणत्या तरी अज्ञात इसमाचा मृतदेह पडलेला आहे. आणि त्याचे पोटावर, कमरेच्यावर, पायावर अज्ञात आरोपीनी धारदार शस्त्राने वार करून जिवानिशी ठार केले आहे. अशा तक्रारीवरुन पोलीस स्टेशन कुन्हा अपराध क्रमांक १६१ / २३ कलम ३०२ भादंवी चा गुन्हा नोंद करण्यात आला. घटनेचे गांभीर्य पाहता मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रा. यांनी ताबडतोब घटनास्थळाला भेट देवून गुन्ह्यात मृतक याची ओळख पटवून आरोपी निष्पन्न करणे व आरोपीस अटक करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत तपासी अधिकारी यांना मार्गदर्शन करून आदेशीत केले होते.त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. श्री. तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील श्रेणी पोलीस उप निरीक्षक मुलचंद भांबुरकर यांचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले. दिनांक २०/०५/२०२३ रोजी पथकातील अधिकारी व अंमलदार हे अज्ञात मृतक याची ओळख पटविण्याकरीता परिसरातील सर्व गोपनिय बातमीदार, पोलीस पाटील व सरपंच यांचे मोबाईल व वॉट्सप ग्रुपवर मृतकचे फोटो वायरल करण्यात आले. दरम्यान पथकातील अंमलदार यांना गोपनिय बातमीदाराकडून खबर मिळाली की, सदर मृतकचे नाव सतीश गंगाधर कुरटकार वय ३८ वर्ष, रा. खडक सावंगा जि. यवतमाळ ह.मु. जळगाव आर्वी येथील असून तो जळगाव आर्वी येथील आहे. अशा माहितीवरुन त्या कुटूंबातील त्याची पत्नी व परिवारास भेटून माहिती घेतली.त्यांना माहिती मिळाली की, मृतक याने १९/०५/२०२३ रोजी सकाळी ११ वा. दरम्यान घरगुती वादावरुन पत्नी व मुलांना दारु पिवून मारहाण केली. तसेच मृतक हा नेहमीच कुटूंबाला दारू पिवून मारहाण करीत असल्याने मृतकचा मुलगा अभी कुरटकार हा त्रस्त झाला होता. तसेच मृतक यश कुरटकार याच्या आईचे सुध्दा अंगावर गेला होता. त्यामुळे नेहमीचा त्रास असहय झाल्याने १. अभी सतीश कुरटकार वय १९ वर्ष, रा. जळगाव आर्वी ता. धामणगाव रेल्वे २. यश जगदीश कुरटकार वय १९ वर्ष, रा. खडक सावंगा जि. यवतमाळ यांनी मृतक यास काहीतरी कारण सांगून कॅनॉलचे रस्त्याने एका शेतात नेवून कोणत्यातरी शस्त्राने मारुन जिवानीशी ठार मारले. पुढील तपास स.पो.नि. गिता तांगडे ठाणेदार, पोलीस स्टेशन कुन्हा हे करीत आहे.

मुंबई मध्ये ४,३०० आमदारांनची वर्णी,काय आहे प्रकार?

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगळ सा., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. शशिकांत सातव सा., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सूर्यकांत जगदाळे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री. तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनात श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, पो.हे.कॉ. पुरुषोत्तम यादव, ना.पो.कॉ. मंगेश लकडे, ना.पो.कॉ. सचिन मसांगे, चालक मंगेश यांनी केली

Related posts

“अनफिट” वाहनांना प्रवेश नाकारला,समृद्धी महामार्गाच्या अतिवेगावर आता करडी नजर.

pcnews24

लातूरच्या सृष्टीचा सलग 127 तास डान्स

pcnews24

पत्नी आणि सासुरवाडीचा त्रास, पतीचा गळफास; पुण्यात हडपसर येथील घटना

pcnews24

महाराष्ट्रात दिवसाढवळ्या बंदूकईच्याजोरावर लूट (बघा व्हिडिओ)

pcnews24

चिंचवड:अज्ञाताच्या फोनने ज्येष्ठ नागरिकाचे बँकेतून दिड लाख लंपास

pcnews24

लोणावळ्यात दोन मुलींवर अत्याचार

pcnews24

Leave a Comment