काळेवाडी फाटा ब्रिजवर भरधाव दुचाकीस्वाराचा मृत्यू
शनिवारी (दि. 20) मध्यरात्री सव्वादोन वाजता डांगे चौकाकडून जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काळेवाडी फाटा ब्रिजवर भरधाव वेगात जाणारी दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
प्रदीप ज्ञानेश्वर पहारे (वय 43, रा. रहाटणी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप पहारे हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14/ईएस 7806) डांगे चौकाकडून (Wakad) जगताप डेअरी चौकाकडे जात होते.काळेवाडी फाटा येथील ब्रिजवर आल्यानंतर त्यांची भरधाव वेगात असलेली दुचाकी स्लीप झाली. यामध्ये प्रदीप हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वाकड पोलीस तपास करीत आहेत